Posts

एटीएम ची रांग आणि रिक्षावाले दादा!!

एटीएम ची रांग आणि रिक्षावाले दादा!! अशीच एक निवांत संध्याकाळ होती, पाई फिरायला निघालो असताना वाटेत एक एटीएम लागले. एटीएम दिसताक्षणी खर्चाच्या आठवणी जाग्या झाल्या आणि पाय आपोआप त्या दिशेला वळाले! रांगेत उभे असताना एक रिक्षावाले दादा माझ्यासमोर उभे होते. वय साधारण ३४-३५ असेल. कानात हेडफोन आणि समोरच्या माणसाकडे लक्ष की कधी बाहेर येतो. मग त्यांचा नंबर लागला आणि ते पैसे काढण्यासाठी आत गेले आणि २-३ मिनिटात बाहेर आले.  बाहेर आल्यावर पटकन रिक्षा काढली आणि निघून गेले!  मी आत गेलो पैसे काढण्यासाठी. आत गेल्यावर असे लक्षात आले की ते दादा त्यांची पेमेंट रिसीट विसरून गेले होते. सहज हातात घेतली तर दिसले की काढण्यात आलेल्या पैश्यांची रक्कम ही ₹२०० होती आणि शिल्लक असलेली रक्कम ही ₹५०० होती. एक सेकंद डोके आणि मन दोन्ही सुन्न झाले आणि मन भरून आले की रिक्षावाले दादा त्या ₹२०० मध्ये काय करणार होते? त्यांचे २०० मध्ये सगळं भागेल का? आपण तर ₹५००० काढायला इथे आलो होतो. आपल्याला इतक्या पैश्यांची खरच गरज आहे का? आपण इतके पैसे का काढतो आहोत? अवास्तव गरजा आणि नको त्या चैनी पूर्ण करण्यासाठी का?? खरच आपल्याला इतके

शाळा

तसा शाळेत जायचा मला कायमच खूप कंटाळा होता. शाळा म्हणजे नाही असे समीकरण होते. कारण अभ्यासात पण हुशार नव्हतो आणि मित्र तर नव्हतेच कधी.. म्हणून जर शाळेत जायचे असेलच तर खिडकी जवळचा बेंच बघायचा आणि खिडकीजवळच बसायचं कारण खिडकीतून बाहेर मला हवं असणारं जग बघता यायचं.. वर्गात काहीही चालो आपण मात्र बाहेर बघत बसायचं आणि आहे तो वेळ मस्त घालवायचा.. खिडकीतून बाहेर बघताना कायम वाटायचं की बाहेरचं जग किती छान, बाहेरचे लोकं किती मोकळे फिरतायेत.. ना त्यांना अभ्यासाची कटकट ना कोणाची बोलणे ऐकायची.. लोकांच्या घरात डोकावताना वाटायचं की आपण पण घरीच पाहिजे. मस्त पलंगावर लोळून टीव्ही बघत बसायचं, आई असेलच कायम आपल्या अवती भोवती.. आईला ऑर्डर सोडायच्या.. ते जग वेगळं आणि त्याला बघायची नजर देखील वेगळी.. पण जसं जसं मोठं होत गेलो तसं तसं ह्या जगाच्या शर्यतीत जगण्यासाठी धावपळ करायला लागलो.. पैशाच्या मागे सगळं काही सोडून बसलो.. आज त्या सगळ्या बाहेर फिरणाऱ्या लोकांमध्ये जेव्हा फिरतो तेव्हा परत शाळेचे दिवस आठवतात. शाळा तर कधी आवडली नाही पण ह्या धावपळीपेक्षा ती शाळाच बरी होती..  आई होती, बाबा होते, माराम

डबा आणि आठवण

डबा आणि आठवण रोज सकाळी सकाळी चिमण्या आवाज करून करून आम्हाला उठवतात आणि आमची छान अशी सकाळ होते.. (उशिरा का होईना पण आमची सकाळ होते). डोळे उघडताच आमचा मोगऱ्या आणि गुलाब्या नाचत असतात. (मोगऱ्या आणि गुलाब्या हे आमच्या मोगरा आणि गुलाबाच्या झाडांची नावे आहेत). ते पण आनंदात नाचत असतात आणि आम्हाला आंदनात उठवतात. आणि मग सुरू होते ती जगाच्या स्पर्धेत धावण्याची सकाळ. रोजचे रुटीन(मुद्दाम लिहिले) चालू होते ते म्हणजे बायकोचे.. आमचे म्हणजे इथून उठून हॉल मध्ये विष्णू पोजिशन... असो (मदत करायला सुरुवात केली आहे).. सगळी सोय तिलाच बघायची असते. स्वयंपाक आणि सगळं काही.. नवऱ्याला आणि तिला वेळेवर ऑफिस ला जायचे असते.. आणि मग सगळं करून ऑफिस ला पळायचे.. रोजच डबा सोबत असतो. डबा उघडताना रोजच येते ती म्हणजे बायकोची छान अशी आठवण. कारण म्हणजे डबा बांधण्याची पद्धत आणि त्यात असलेलं तिचं प्रेम आणि काळजी.. ३-४ प्रकारचे डबे असतात. प्रत्येक डब्यात वेगळं भाजी,चटणी,कोशिंबीर पोळ्या आणि ह्याने थोडं जास्त खावं म्हणून तिच्या पोळीतला एक तुकडा अजून एक्सट्रा.. पण त्यात असलेली काळजी बघून रोजच मस्त वाटतं..  सकाळचा व

मैं कभी बतलाता नहीं, पर अंधेरे से डरता हुं मैं माँ"

मैं कभी बतलाता नहीं, पर अंधेरे से डरता हुं मैं माँ" काल रात्री हे गाणे ऐकताना असाच विचार डोक्यात आला की आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे नाही? बऱ्याच गोष्टी अश्या असतात आपल्या आयुष्यात ज्या करायची इच्छा नसून करणे भाग असते जसे आपल्या आवडत्या गोष्टी बाजूला ठेवून आपण करत असलेलो नोकरी,धंदा किंवा संसार.  आपल्याला देवाने किंवा आपण स्वतःच एक पर्याय निवडून दिला आहे आणि तो म्हणजे पैसा. त्याच्याशिवाय आपल्या आयुष्यात काही पर्याय उरलेला नाही.. ना नाते ना आयुष्य ना छंद! आयुष्यात एक दिवस त्याच्यामागे धावून धावून कधी आपल्याला तो अंधेरा आपल्यात सामावून घेईल हे कळणार सुद्धा नाही.  आपण दर वेळेला असे ऐकतो कि आयुष्य जगण्याची कला काही लोकांना अवगत असते म्हणे, पण ती कशी? कुठ्ल्याना कुठल्या गरजेवर दगड ठेऊन त्यावर पाय ठेवून उभा राहिल्याशिवाय ती अवगत झालेली नसते. आपणही तसे केले तर?? मला माहित नाही कि नक्की काय होईल ते पण असे वाटते की नक्कीच आपण खूप छान आयुष्य जगू शकू.. आपल्यातल्या म्हणजे आपल्या आत असलेल्या गोड स्वतःला जपू शकू. देवाने एकच आयुष्य दिलेले आहे त्याला छान जगण्या

आयुष्य ह्या शब्दाचा अर्थ खुंटला आहे का??

दिसामागून दिस सरे तशी आमच्या सोसायटी मध्ये रोज रात्री मित्रांची गप्पांची मैफील रंगलेली असते. गप्पा चालू असताना एक मित्र ऑफिस वरून उशिरा घरी येताना दिसला, सगळ्यांनी आपलं नेहमीप्रमाणे चौकशी सुरू केली, काय म्हणतोस? घरी कसे सगळे? तर तो बोलता बोलता म्हणाला की जातायेत दिवसामागून दिवस, ना वेळ ना काळ, ना सण ना वार, ना घर ना दार आणि कसलं कॅलेंडर नि कसलं काय! घर म्हणजे फक्त एक आराम करण्यासाठीची जागा उरली आहे.. खरच असं झालंय का?  तसं बघायला गेलो तर आपलं कॅलेंडर कडे तर दिवसातून एकदापण लक्ष जात नाही रोज सकाळी उठायचे आणि आवरून ऑफिसला निघायचे. जर कुठला फॉर्म किंवा माहिती भरायची वेळ आलीच तरच मोबाईल मध्ये तारीख बघायची.   सगळ्यांचे लक्ष असते तर येणाऱ्या शनिवार आणि राविवाराकडे.. खरच माणूस आयुष्याच्या गरजांमध्ये पिळला गेला आहे का? खरच माणसाच्या आयुष्यात शनिवार आणि रविवार ह्या दिवसांचेच महत्व उरले आहे का? आयुष्य ह्या शब्दाचा अर्थ खुंटला आहे का??
नमस्कार मित्रहो!!!! आज मी काही परत कविता लिहिलेली नाही.पण मी आयुष्यात घडलेली खरी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला सगळ्यांना आवडेल.कारण ती गोष्ट आहे प्रेमावरची आणि मला माहित आहे कि आजचा तरुण वर्ग हा प्रेमाच्या बाबतीत जरा जास्तच जागरूक आहे. मी पण आहे आणि खूप जास्त आहे.कारण प्रेम हा शब्द जरी ऐकला तरी प्रत्येकाच्या मनात काहीतरी व्हायला लागतं आणि प्रत्येकाच्या मनात कोणत्या ना कोणत्या मुलीचा किंवा मुलाचा चेहरा उभा राहतो आणि ते साहजिकच आहे कारण प्रेम हि संकल्पनाच खूप वेगळी आहे आणि ती प्रत्येकाला हवी हवीशी आहे. कोणी अगदी तरुण पणी प्रेमात पडत तर कोणाला अगदी चाळीषित प्रेम होतं आणि कोणी तर अगदी लहान पणीच प्रेमात पडत जेव्हा त्यांना अक्कल नसते तेव्हा. पण कोण काय करू शकतं,प्रेम हे कधी पण,केव्हा पण आणि कसं पण होतं. त्यातलाच एक माझा मीत्र आहे त्याला जेव्हा अक्कल नव्हती तेव्हा तो प्रेमात पडला.म्हणजे तो फक्त ८ वीत आणि तो तेव्हा एका मुलीच्या प्रेमात पडला. आणि मग काय वेळेचं भान नाही,घरच्यांचं भान नाही,तहान नाही,भूक नाही.भूक होती खूप जोराची होती पण ती भूक होती प्रेमाची.होय प्रेमाची भूक..... मग काय सगळा वेळ ति

माझ्या मिठीत ती

  माझ्या मिठीत ती ती आली माझ्या मिठीत एकदा लोकांचे भानच तिला राहिले नाही वेडा झालो तिच्या स्पर्शाने असं वाटलं कोणीच आम्हाला पाहिलं नाही    १   मिठीत आल्यावर मला म्हणते मिठी अशीच घट्ट राहू दे तुझ्यासोबातचे आयुष्याचे स्वप्ने मला तुझ्यासोबतच पाहू दे      २   मिठीत असल्यावर मला विचारते मला कधी सोडणार तर नाही ना? आणि तिला सांगणार कसं तिच्याशिवाय माझा श्वासच चालेना     ३   मिठीत असल्यावर माझ्या ती हात माझा घट्ट पकडते आणि माझ्याकडे पाहता पाहता का माहिती ती का रडते      ४   रडण्याचे कारण तिला विचारले असता ती मला काहीच सांगत नाही आणि परत माझ्या मिठीत शिरुनी आमच्या आयुष्याचे स्वप्न ती पाही      ५